विसाव्या शतकातील शक्तिपातयोगविद्येचे अध्वर्यू असलेल्या प.पू.सद्गुरू योगिराज श्री.श्री.द.(मामा) देशपांडे महाराजांच्या ठायी श्रीदत्तसंप्रदाय, श्रीभागवतसंप्रदाय व श्रीनाथसंप्रदाय यांचा अद्भुत, विलक्षण त्रिवेणीसंगम झालेला होता. त्यांनी संकल्पिलेल्या आणि अंगीकारलेल्या अनेक प्रकल्पांपैकी श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान हा श्रीक्षेत्र-आळंदी येथील समाजहितैषी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ संकल्पना
जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंडे ही चालती बोलती ज्ञानपीठेच होती. ‘‘ज्ञान ज्या ठिकाणी गंगौघासारखे स्वच्छ, सुंदर व अफाट अन् मुक्तपणे उपलब्ध असेल, ते ज्ञानपीठ खऱ्या अर्थाने त्यांचे सर्वांगसुंदर व उचित स्मारक ठरेल. तत्वज्ञान व संत वाङ्गमय शिकण्याची व त्याद्वारे आत्मोद्धार करून घेण्याची कळकळ असणारे साधक व त्यांना निरहंकारी व मुमुक्षुत्वाने ज्ञान देण्याची इच्छा असणारे ज्येष्ठ अभ्यासक यांच्यासाठी हे चिंतनाचे समग्र व्यासपीठ असेल. जगातील सर्व धर्म संप्रदायांचे व तत्त्वज्ञानाच्या विविध प्रणालींचे हवे ते शिक्षण तसेच वैदिक व संत साहित्य ही प्रधान आस ठेवून, त्या साहित्याच्या अनुषंगाने शिक्षण घेण्यासाठी या ज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली आहे."
हे ज्ञानपीठ ही आदर्श, उन्मुक्त अशी आधुनिक संस्कृती ठरावी ! सारग्राही वृत्तीने व दृष्टीने सर्व धर्म आत्मतत्वाकडेच जाणारे असून, ते एकाच परमतत्वाची वैविध्यपूर्ण अंगे आहेत. हे लक्षात घेऊन, ज्यास जे रूचेल, भावेल ते समजावून घेऊन आचरण करणे हा सर्वांचा मूलभूत व ईश्वरदत्त जन्मसिद्ध हक्क जपण्यासाठी हे ज्ञानपीठ कार्यरत असेल.
e-Library

वृत्तांत
निवडक वृत्तांत- नगरकर यांची ग्रंथदेणगी
दिनांक २३ फ़ेब्रुवारी, २०२० रोजी
श्री. रा. शं. नगरकर यांच्या कुटुंबीयांतर्फ़े १०,००० पेक्षा अधिक ग्रंथ श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाला देणगी स्वरुपात मिळाले. हे ग्रंथ ऐतिहासिक अशा नगरकर वाड्यामधून मंडळाच्या स्वयंसेवकांनी आणले.
दिनांक ८ जानेवारी २०२२
व्याख्याते: श्री. श्रीकांत दामले
ठिकाण: ‘श्रीपाद निवास’,आनंद नगर, सिंहगड रस्ता, पुणे ४११०५१
सकाळी: १०. ०० ते १०. ४५ आणि ११. ०० ते ११. ४५
अभ्यास वर्ग २ ऑगस्ट २०२५ व्याख्याते: श्री. श्रीकांत दामले ठिकाण: ‘श्रीपाद निवास’,आनंद नगर, सिंहगड रस्ता, पुणे ४११०५१ सकाळी: १०. ०० ते १०. ४५ आणि ११. ०० ते ११. ४५
२३ जुलै
अभ्यास वर्ग २३ जुलै २०२५ व्याख्याते: श्री. श्रीकांत दामले ठिकाण: ‘श्रीपाद निवास’,आनंद नगर, सिंहगड रस्ता, पुणे ४११०५१ सकाळी: १०. ०० ते १०. ४५ आणि ११. ०० ते ११. ४५